अनुसूचित जमातीच्या महिला व पुरुष बचत गटांकरीता आर्थिक सहाय्याच्या योजना
Ø पात्र बचतगटांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमूर अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेमध्ये अनुसूचित जमातीच्या महिला, पुरुष बचत गट, समूहाकरीता अनुसूचित जमातीच्या समूह, बचत गटाद्वारे आर्थिक सहाय्याच्या योजना राबवायच्या आहेत.
यात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यासाठी मासोळी बीज आणि मासोळी संरक्षणाकरीता साहित्य व सामग्री खरेदीसाठी 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य, मशरूम, आंबा संकलित करून ठेवण्यासाठी सोलर ड्राय मशीनचा पुरवठा करण्याकरीता 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य तसेच टोळीपासून तेल काढण्यासाठी मशीन खरेदीकरीता 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य देणे आदींचा आहे. योजनानिहाय पात्र बचतगटांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.