लाखनी येथे झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ
भंडारा, दि. 10 : हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी न्यायालय लाखनी येथे बचत गटांनी तयार केलेले झेंडे विक्री केंद्र शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी लाखनी न्यायालय येथील न्यायाधीश श्री. धडके सर यांचे अध्यक्षते खाली, न्यायधिश श्री. सिद्दीकी सर यांचे हस्ते उद्घाटन झाले असून. प्रमुख उपस्थिती तहसिलदार महेश शितोळे सर, गट विकास अधिकारी पंचायत समिती लाखनी शेखर जाधव, फौजदार अमोल तांबे व प्रकाश तलमले, यांचे उपस्थितीत पार पडले. त्यामधे सर्व न्यायालय अधिकारी, कर्मचारी तसेच तालुका विधी समिती सदस्य, वकील व नागरिक उपस्थित होते .