जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल दिनांक : 09.08.2022, सायं : 7.30 वाजता

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली

जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

दिनांक : 09.08.2022, सायं : 7.30 वाजता

————-

*1. वैनगंगा नदी :*

# संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 4 गेट उघडलेले असुन 20,200 क्युसेक्स (572 क्सुमेक्स) विसर्ग सुरु आहे.

# गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 गेट 1.50 मी. ने व 28 गेट 1.00 मी. ने उघडलेले असुन 2,62,073 क्युसेक्स (7,421 क्युमेक्स) विसर्ग सुरु आहे.

# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 4,97,800 क्युसेक्स (14,096 क्युमेक्स) आहे.

🔴# *आष्टी* या सरीता मापन केंद्रावील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *धोका पातळीच्या वर* आहे.

🟡# *वडसा व वाघोली* या सरीता मापन केंद्रावील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या जवळ* आहे.

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणातुन सोडलेल्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने *नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

 

*2. वर्धा नदी :*

# उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट 1.40 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 94,574 क्युसेक्स (2,678 क्युमेक्स) आहे.

# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट 0.80 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 78,528 क्युसेक्स (2,167 क्युमेक्स) आहे.

🟠# बामणी (बल्हारशा) व सिरपूर/ सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या वर* आहे.

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणातुन सोडलेल्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

 

*3. प्राणहिता नदी :*

🟡# महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या जवळ* आहे.

# नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने *नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

 

*4. गोदावरी नदी :*

# श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 20 गेट उघडलेले असुन विसर्ग 1,39,380 क्युसेक्स (3,947 क्युमेक्स) आहे.

# लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 7,30,510 क्युसेक्स (20,686 क्युमेक्स) आहे.

🟡# कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या जवळ* आहे.

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणातुन सोडलेल्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने *नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

 

*5. इंद्रावती नदी :*

🔴# *जगदलपूर* या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *धोका पातळीच्या वर* आहे.

🟠# पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या वर* आहे.

🔴# *पर्लकोटा* नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरी नोंदीनुसार *धोका पातळीच्या वर* आहे.

# इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने *नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.*