सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचेमार्फत
संपुर्ण जिल्हयात सर्वेक्षणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार
गडचिरोली, दि.08: जिल्हयातील सहकारी संस्थांचे सभासद/संचालक/पदाधिकारी यांना सुचित करण्यात येते की, सहकार आयुक्त़ व निबंधक, सहकारी संस्था, म. रा.पुणे यांचे कडील, दि. 01/08/2022 रोजीचे परिपत्रकान्वये कागदोपत्री असलेल्या/बंद/कार्यस्थगीत संस्था व लेखापरिक्षण न झालेल्या सहकारी संस्थांचे, दिनांक 15 ऑगष्ट 2022 ते दिनांक 15 सप्टेंबर, 2022 या कालावधीत जिल्हयातील सहकरी खात्यातील अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत संपुर्ण जिल्हयात सर्वेक्षणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तदनंतर सर्वेक्षणा अंती कागदोपत्री/बंद/कार्यस्थगीत आढळलेल्या सहकरी संस्थांवर संबंधीत संस्थांचे निबंधक हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्या खालील नियम 1961 तसेच उपविधी मधील तरतुदीनुसार वैधानिक कार्यवाही करतील, तरी गडचिरोली जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांचे सभासद/संचालक/पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली पी.एस. धोटे यांनी कळविले आहे.