हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी तुमसर येथे जलोष्षात बाईक रॅली
उत्कृष्ट आयोजनाने ठरली लक्षवेधी
भंडारा दि. 8 : जिल्हयात हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आज पंचायत समिती तुमसर ते अंबागड किल्यालतपर्यत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सुरू झालेल्या या बाईक रॅलीत पाचशेहून अधिक तरूण,तरूणी,विदयार्थीनी,गृहीणी,अधिकारी –कर्मचारी यांनी उत्साहात सहभाग घेतला.
जिल्हयात हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यात गटविकास अधिकारी,तहसीलदार प्रचार –प्रसार करत आहेत.या प्रसारात सामान्य नागरिक ही तेवढयात उत्साहाने सहभाग घेत आहेत.आजच्या या बाईक रॅलीचे उदघाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हेरीटेज साईट असलेल्या आंबागड किल्यामावर साफसफाई यावेळी करण्यात आली. या रॅलीत उमेदच्या महिलांचा उल्लेखनिय सहभाग होता. रॅलीमध्ये कल्पकतेचा वापर करण्यात आला होता. यात महिला अधिकारी -कर्मचारी यांना केसरी रंगाचा ड्रेस कोड दिला होता, पुरुष अधिकारी कर्मचारी- यांना पांढरा शर्ट/ टीशर्ट तर निळया रंगाचा पॅट देण्यात आला होता. उमेद महिला कॅडर/समूह महिला यांच ड्रेस कोड हिरवी साडी/सलवार या स्वरूपात रॅली काढ्याव्त आली. सोबतच चित्ररथ तयार करण्यात आले. या बाईक रॅली दरम्यान लेझीम, सांस्कृतिक कार्यक्रम, गोंडी नृत्य, विविध प्रकारचे नृत्यांची झलक,चित्ररथाव्दारे जनजागृतीपर कार्यक्रम दाखविण्यात आले.
या रॅली दरम्यान प्रत्येक बाईक वर राष्ट्रीय तिरंगा झेंडा लावण्यात आला होता.हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी आजची रॅली ही लक्षवेधी ठरली. अशा प्रकारे काढण्यात आली यात बाईक रॅलीमध्ये राजूभाऊ कारेमोरे तुमसर-मोहाडी विधानसभा आमदार, संदीप कदम जिल्हाधिकारी, संदीप टाले जी.प. उपाध्यक्ष , राजेश सेलोकर (पशुधन व कृषी सभापती), दिलीप सारवे, धुरपता मेहर जी.प. सदस्य, चंद्रशेखर राहांगडाले प.स. सभापती, हिरालाल नागपुरे उपसभापती प.स तुमसर, प.स. सदस्य मा. मनोज चुरमुडे, मीनाक्षी शहारे, पल्लवी कटरे , आम्रपाली पटले,. सुशीला पटले. सलोनी भोंडे, गटविकास अधिकारी ,उमेश नंदागवळी प.स. तुमसर यांचा सहभाग होता. शाळेच्या मुलांकडून आमदार श्री.कारेमोरे,व जिल्हाधिकारी संदीप कदम यांना तिरंगा राखी बांधण्यात आली. दुपारी 12च्या दरम्यान आंबागड किल्यावर पोहोचल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमात चित्र प्रदर्शनीचे अनावरण करण्यात आले. त्याच प्रमाणे उमेद बचतगटाच्या समूह महिला उत्पादित मालाची प्रदर्शनी मध्ये सहभागी 12 स्टॉल वर विक्री करण्यात आली . नंतर ऐतिहासिक आंबागड किल्ला वर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यात सर्व मान्यवर व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सफाई अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केले. रॅली व स्वच्छता कार्यक्रमात एक हजार जणावरून अधिक जणांनी सहभाग घेतला.