हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत उमेदच्या उत्पादक गटामार्फत तिरंगा विक्री केंद्राचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : पोंभुर्णा पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व तहसील कार्यालय यांच्या समन्वयातून हर घर तिरंगा उपक्रम, तालुक्यामध्ये यशस्वीपणे राबविण्याकरिता तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्याकरीता उमेदच्या उत्पादक गटामार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्र उघडण्यात आले आहे.
विक्री केंद्राचे उद्घाटन तहसीलदार शुभांगी कनवाडे, मुख्याधिकारी श्री. तिरणकर, गटविकास अधिकारी महेश वळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तालुक्यात हर घर तिरंगा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित हाताळावेत व कुठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही. तसेच तिरंगा खरेदी करीता नोंदणी गावातील उमेद कॅडर व उत्पादक गट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक राजेश दुधे, तालुका व्यवस्थापक श्री. भिमटे, श्री. भडके, प्रभाग समन्वयक अहिरकर, रंगारी, स्मिता आडे, किशोर महोरकर आदी उपस्थित होते.