गडचिरोली जिल्हयात 144 कलम लागू
गडचिरोली, दि.05: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत , औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT-CET 2022 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिनांक 05/08/2022 ते 11/08/2022 (09/08/2022 वगळून) या कालावधीत PCM गृपची प्रथम सत्र सकाळी 7.30 ते 12.00 व दिव्तीय सत्र दूपारी 12.30 ते 06.45 या दोन सत्रात तसेच दिनांक 12/08/2022 ते दिनांक 20/08/ 2022 (15,16 व 19 ऑगस्ट 2022 वगळून) या कालावधीत PCB गृपची प्रथम सत्र सकाळी 7.30 ते 12.00 व दिव्तीय सत्र दुपारी 12.30 ते 06.45 या दोन सत्रात सत्या स्किल डेव्हलोपमेंट सेंटर , गोंडवाना विद्यापीठ चे विरुध्द बाजुला ,एम.आय.डी.सी.रोड,नवेगाव वार्ड क्र.3 गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, परिक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,1973 चे कलम 144 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर , पानपट्टी,टायपींग सेंटर,एस.टी.डी.बुथ,ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यमांना परीक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्यूलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील.तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करु नये. तसेच परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनीप्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. कोवीड-19 चे अनुषंगाने, शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही आदेश निर्गमीत केले आहे.
हे आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश दिनांक 05 ऑगस्ट 2022 ते 20 आगस्ट 2022 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी गडचिरेाली येथील सर्व संबंधित परीक्षा केंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.