अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज
गडचिरोली, दि.05: महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंगीकृत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असुन आर्थिक दृष्टया मागासलेलया अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरीता विविध कर्ज योजना राबविते. या महामंडळा द्वारे राबविले जाणारे शैक्षणीक योजनाची माहिती पुढील प्रमाणे.
मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई मार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 व्यवसायिक अभ्यासक्रमाचे घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज चे आवेदन घेण्यात येत आहे. अधिक माहिती साठी महामंडळ वेब साईट www.mamls.maharashtra.gov.in www.mamfdc.org वर संर्पक करण्याचे आवाहन जिल्हा कार्यालय चंद्रपूर (अतिरीक्त जिल्हा गडचिरोली ) येथे संर्पक करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.नफीस शेख 9822662986 रुम नं. 8 छोटी मस्जीद कॉम्पलेक्स स्टेट बँक ऑफ इंडिया समोर कस्तूरबा रोड चंद्रपूर यांनी केली आहे.