भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर आक्षेप किंवा सूचना आमंत्रित
भंडारा, दि. 2 : भंडारा तालुक्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या भोजापूर, केसलवाडा, सालेबर्डी पा., सिरसघाट पु., टेकेपार पु., तिड्डी, बोरगाव बु. पु., ईटगाव पु., सुरेवाडा पु., खैरी पा., संगम पु., पिपरी पु, खमाटा, परसोडी, राजदहेगाव, खराडी, खरबी, कोरंभी, गणेशपूर, सिल्ली, मंडनगाव, आमगाव, दवडीपार बा., चिखली, इंदुरखा, खमारी, दिघोरी, मुजबी, ठाणा, दवडीपार बे., खैरी बे., कवलेवाडा, बासोरा, सावरी ज., नांदोरा, साहुली, कवडसी, शहापूर, मोहदूरा, हत्तीडोई, जाख, बेला, पांढराबोडी, कोथूर्णा, गराडा खु., पिंडकेपार, सिरसी, कारधा, डोडमाझरी टे., टेकेपार मा., वाकेश्वर, चिखलापहेला, मालीपार, नवरगाव व खोकरला या ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 जुलै 2022 पर्यंत प्रारुप आरक्षणावर कार्यवाही करुन 1 ऑगस्ट 2022 रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुदा परिशिष्ट 13 व नमुना-ब संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील व पंचायत समिती कार्यालय भंडारा येथील सूचना फलकावर सर्व नागरिकांसाठी अवलेकनार्थ उपलब्ध आहे. प्रसिध्दक करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुदा परिशिष्ट 13 व नमुना-ब वर कोणत्याही नागरिकांच्या आक्षेप किंवा सूचना असल्यास 3 ऑगस्ट 2022 पर्यंत तहसील कार्यालय भंडारा येथील निवडणूक विभागात सादर करावे. 3 ऑगस्ट नंतर सादर केलेल्या आक्षेप व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कळविले आहे.