नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
चंद्रपूर, दि. 28 जुलै : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर, 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुचना प्रसिद्ध होईल. दि. 15 ऑक्टोबर 2022 ला मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीचे प्रथम पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार.
25 ऑक्टोबर 2022 ला मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसची द्वितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार. नमुना-19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि. 7 नोव्हेंबर 2022 असेल. 19 नोव्हेंबर 2022 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी तर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 असेल. दि. 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. दि.30 डिसेंबर 2022 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू होत असल्याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.