जिथे भ्रष्टाचार तिथेच ‘ईडी’ कारवाई-हेमंत पाटील भ्रष्टाचारावर आळा घालण्यात मोदी सरकारला यश

जिथे भ्रष्टाचार तिथेच ‘ईडी’ कारवाई-हेमंत पाटील

भ्रष्टाचारावर आळा घालण्यात मोदी सरकारला यश

मुंबई।

देशात गेल्या काही दशकांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर आता हळूहळू वेसण घालण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.एक-एक प्रकरणात चौकशी करीत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) योग्य कारवाई केली जातेय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक नेते तुरूंगात आहेत. पंरतु,केंद्रीय यंत्रणेच्या या कारवाईविरोधात विरोधक आक्रमक झाले असून प्रादेशिक पक्षांना संपवण्यासह संघराज्य संकल्पनेवर आघात करण्यासाठी मोदी सरकार सुडबुद्धीने कारवाई हे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला जातोय. या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसून ईडी कुणावरही चुकीची कारवाई करीत नाही. ज्या ठिकाणी भ्रष्टाचार, मनी लॉन्ड्रिंग करण्यात आले त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करीत तपास केला जात आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारावर आळा घालण्यात बरेच यश आले आहे. कॉंग्रेसने ६० वर्ष सत्ता भोगली. कॉंग्रेस सरकारचा भ्रष्टाचार तसेच सर्वसामान्यांवरील अन्यायामुळे हे सरकार पुन्हा सत्तेत आले नाही.परंतु, २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर पाच वर्ष चांगली कामे केल्याने जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले आहेत.मोदी सरकार देशाचा गाडा उत्तमरित्या हाकत आहे, हे यावरून अधोरेखित झाले आहे.

पंतप्रधानांची प्रशासनावर उत्कृष्ट पकड असून देशातील सर्वसामान्यांना घेवून ते चालत आहेत. एससी, एसटी, ओबीसी तसेच सर्वसामाजाला विविध योजनेच्या माध्यमातून मदत पोहचवली जात आहे. वेगवेगळ्या योजनेतून मिळाणारा निधी थेट लाभार्थ्यांच्या खातात पोहचत आहे. भ्रष्टाचारावर त्यामुळे आळा बसला आहे. पुर्वीच्या कॉंग्रेसच्या काळात हजारो कोटी रुपये अनुदान, मदत म्हणून दिली जायची. पंरतु, यातील केवळ काही टक्केच निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत होता, असा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.