मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजना
भंडारा, दि. 26 : नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती यासंबंधी पक्षकारांना 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस प्राप्त असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधीत पक्षकारांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
संबंधित पक्षकारांनी 31 जुलैपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल. अन्यथा पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्ती प्रमाणे थकीत शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल.