भंडारा : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
भंडारा, दि. 26 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्ह्यातील एकुण 382 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक महेश पाटील यांनी कळविले आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आरक्षण सोडत काढण्याकरीता विशेष ग्रामसभेची सूचना देणे 26 जुलै, विशेष ग्रामसभा बोलावुन तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, व सर्वसाधारण महिला)-29 जुलै, सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे 1 ऑगस्ट, प्रभाग निहाय निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 3 ऑगस्ट, उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देण 10 ऑगस्ट, उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसुचनेस जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे 12 ऑगस्ट, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिध्दी देणे -17 ऑगस्ट. सर्व तहसीलदारांना याबाबतचे लेखी निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.