मत्स्यव्यवसाय कामगार, विक्रेते, मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कमांशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगार यांनी नोंद करावी
गडचिरोली, दि.२२ : देशातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या Eshram Poratl वर मासेमारी करणाऱ्या मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते, मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कामगारांची नोंदणी https://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर करणे आवश्यक आहे.सदर पोर्टल मध्ये नोंदणी झाल्यास मत्स्यव्यवसाय संबधित कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मृत्यू झाल्यास रुपये 2 लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 1 लक्ष मदत देणे शक्य होईल. व पोर्टलवरील माहिती अचानक उद्भवीणाऱ्या व राष्ट्रीय महामारी सारख्या परिस्थितीमध्ये मदत वितरण करतेवेळी सहाय्यक ठरेल.
सदर पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी वयोमर्यादा 16 ते 59 वर्ष आहे.नोंदणी करणारे कामगार Employs state insurance (ESI), Employees provident fund organization (EPFO), सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), सभासद व शासन सेवेतील कर्मचारी व आयकर भरणारे नसावेत.
जिल्ह्यातील मत्स्यकामगार स्वतः या पोर्टलवर नोंदणी करू शकतात अथवा जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र – Common service Centers ( CSCs) सरकार सेवा केंद्रामध्ये मोफत नोंदणी करू शकतात.
– सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय गडचिरोली