साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज आमंत्रित Ø 25 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज आमंत्रित Ø 25 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 19 जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी व विद्यार्थीनीना सरासरी 65 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

त्याकरिता, विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याच्या दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला, शिधापत्रिका, पुढील वर्षात प्रवेश घेतलेले बोनाफाईड सर्टीफिकेट व दोन पासपोर्ट फोटोसह दि. 25 जुलै 2022 पर्यंतच्या कालावधीत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर येथे सर्व साक्षांकीत दस्तऐवजासह दोन प्रतीत अर्ज सादर करावे. असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), चंद्रपूरचे जिल्हा व्यवस्थापक एम.डी. वानखेडे यांनी केले आहे.