आरसेटीव्दारा मोबाईल दुरुस्तीचे निशुल्क प्रशिक्षण
भंडारा, दि. 18 : बॅंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे निशुल्क मोबाईल दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. 30 दिवसीय प्रशिक्षणात मोबाईलचे प्रकार, वेगवेगळे सॉफ्टवेअर, 3 जी, 4 जी, एलटीई, ड्युअल बँड चीप चे सोल्डरींग, एमएमसी प्राब्लेम दुरुस्ती, डिस्प्ले दुरुस्ती, हार्ड रिसेट कोड्स प्राब्लेम दुरुस्ती, मोबाईल व्यवसायाचे व्यवस्थापन, कर्जविषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायातील संधी, बाजार सर्वेक्षण व बॅंकेच्या योजनांबद्दल माहिती दिली जाईल.
स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किंवा नापास, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बेरोजगार पुरुषांनी मुलाखतीकरिता 30 जुलै 2022 ला सकाळी 10 वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्था संचालक मिलिंद इंगळे यांनी केले आहे. प्रशिक्षण प्रवेशासाठी आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड, मनरेगा कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता 9511875908, 8669028433, 9766522984 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.