संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजाकरीता अनुदान योजना
गडचिरोली, दि.15: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची व होलार) वय 18-50 या वयोगटातील व्यक्तींकरीता व्यवसाय करण्याकरीता 50 टक्के अनुदान योजना, बिज भांडवल योजना या दोन योजना जिल्हा कार्यालय, गडचिरोली मार्फत सुरु आहेत. तरी इच्छुक व्यक्तींनी चालु वर्षीचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला, कोटेशन व बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जोडून जिल्हा कार्यालयाला 3 प्रतीमध्ये फॉर्म सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 07132-223025 वर संपर्क साधावा.