आकांक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला व युवतींना नि:शुल्क निवासी प्रशिक्षण
Ø ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामींग अभ्यासक्रम
चंद्रपूर, दि. 14 जुलै : राज्यातील कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आकांक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूर व अमरावती विभागातील 200 महिला / युवतींकरीता नवगरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर या संस्थेद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाभिमुक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असून ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामींगचे 18 महिन्याचे नि:शुल्क निवासी प्रशिक्षण आयोजित आहे.
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधनी येथे होणा-या या प्रशिक्षणात वयोमर्यादा 17 ते 28 वर्षे असून 12 वी पास किंवा आयटीआय पास महिला / युवती या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. चाळणी परिक्षेद्वारे या प्रशिक्षणाकरीता प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. 10 ते 30 जुलै 2022 रोजी ऑनलाईन परिक्षेचे आयोजन व 7 ऑगस्ट 2022 रोजी ऑफलाईन परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जुलैपासून परीक्षा नोंदणीला सुरूवात झाली असून नोंदणी करण्याकरीता http://bitly.ws/sAa८ या लिंकवर अर्ज करावा.
अधिक माहितीकरीता www.navgurukul.org या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नवगुरुकुल फाऊंडेशनचे राज्यस्तरीय समन्वयक श्री. नितीश (8891300300) व अजय चंद्रपट्टण (9309731562) यांच्याशी संपर्क करावा. आकांक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला व युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनातर्फे केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला / युवतींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.