स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांनी लाभ घ्यावा
भंडारा, दि. 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांसाठी स्टँड ॲप इंडिया ही योजना आणली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजकांनी दहा टक्के स्व: हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते. यासाठी पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे सपंर्क साधवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.