शौर्याचे अनुकरणीय कृत्य करणाऱ्या बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यासाठी अर्ज आमंत्रित
गडचिरोली,दि.08: गडचिरोली जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की,शौर्याचे अनुकरणीय कृत्य करणाऱ्या मुलांना प्रत्येक वर्षी इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड वेलफेअर नवी दिल्ली या संस्थेकडून राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येते.सदर पुरस्काराकरीता दिलेल्या निकषानुसार ” शारीरिक इजा होण्याचा धोका किंवा जीवाला धोका किंवा समाजातील घातक कृत्य /गुन्हयांविरुध्द धैर्य आणि धाडसी पावूल उचलणारी ” 6 ते 18 वयोगटातील मुले सदर पुरस्काराकरीता पात्र असतील.
सन 2022-23 या कालावधीत सदर संस्थेने 6 ते 18 वयोगटातील मुलांचे ऑनलाईन नामांकनाकरीता आवाहन केलेले आहे. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार या योजनेची सविस्तर माहिती तसेच नामांकन अर्ज तसेच नामांकन करण्याची पध्दती www.iccw.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर नामांकन अर्ज दिलेल्या संकेत स्थळावरुन प्राप्त करता येईल.
अधिकच्या माहितीकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली,बॅरेक क्र.1,खोली क्र.26 व 27,कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली,दुरध्वनी क्र.07132-222645 येथे संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.