शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
भंडारा, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखनी येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट 2022 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला 17 जून 2022 पासून सुरुवात झाली आहे. आय. टी. आय. ला प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी संस्थेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
इलेक्ट्रीशियन, आय. सी. टी. एस. एम, जोडारी व यांत्रिक मोटार गाडी हा दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम, संधाता एक वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम व फॅशन टेक्नॉलॉजी, कम्पुटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) एक वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संस्थेत मुली व महिलांकरिता सहा व्यवसायात प्रवेशाच्या 30 टक्के जागा आरक्षित आहे. तसेच फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायात संपूर्ण मुली व महिलांकरिता आहे. तरी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था लाखनीच्या प्राचार्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी गटनिदेशक पी. पी. बेतावार (9405121907) व शिल्प निदेशक ए. बी. पेठशिवणीकर (9404229631, 9850648190) यांचेशी संपर्क साधावा.