शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात पाच रुग्णांना डिस्चार्ज तर दोन कोरोना बाधित
एकूण डिस्चार्ज 66812
एकूण पॉझिटिव्ह 67983
क्रियाशील रुग्ण 29
आज मृत्यू शून्य
एकूण मृत्यू 1142
रिकव्हरी रेट 98.28 टक्के
मृत्यू दर 01.68
आजच्या टेस्ट 762
एकूण टेस्ट 611426
भंडारा, दि. 24 : जिल्ह्यात शुक्रवारी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.24) बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन आहे. शुक्रवारी 762 व्यक्तींची चाचणी केली असता दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 29 सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 812 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 983 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.28 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 11 हजार 426 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 67 हजार 983 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 01, तुमसर 01, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.