जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन संपन्न
गडचिरोली, दि.22: आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दिर्घ करते. दिनांक 21 जुन 2015 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रमानुसार व यु. बी. शुक्ल, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा य सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांचे निर्देशानुसार तसेच आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय, गडचिरोली व सर्व तालुका मुख्यालयी येथे दिनांक 21 जून, 2022 रोजी योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास यु.बी.शुक्ल, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली, रविंद्र दोनाडकर, अध्यक्ष, जिल्हा अधिवक्ता संघ, गडचिरोली, यु. एम. मुधोळकर, जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली, एम. आर. वाशिमकर, मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली सी. पी. रघुवंशी, सह दिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली, विघ्ने मॅडम, अति. सह दिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली, योगा प्रशिक्षक म्हणुन सौ. रजनीताई दोनाडकर, गडचिरोली, सौ. ए.एस.घरोटे, प्रबंधक जिल्हा न्यायालय, गडचिरोली, गडचिरोली अधिवक्ता संघाचे सदस्य आणि बहुसंख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. योगा केवळ शारीरिक तंदुरूस्ती आणत नाही तर जास्तीत जास्त मानसिक शांती देते. यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. यासह हे शरीराच्या सर्व क्रियाकल्पांवर देखील नियंत्रण ठेवते. सुख, दुख: प्रेम यासारख्या
जिवनातील सर्व अभिव्यक्तीवर योगांचे नियंत्रण असते. योगा शरीर निरोगी ठेवते, वजन कमी करते, चिंता कमी करते, मनोबल वाढवते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, जिवनासाठी उत्साह वाढवते, ऊर्जा वाढवते तसेच शरीर लवचिक बनवते, अशाप्रकारे विविध फायदे नियमित योगा केल्यामुळे मिळते, असे योगा शिबीरातुन उपस्थितांना संदेश देण्यात
आला. दिनांक 21 जून 2022 रोजी जिल्हा न्यायालयाचे परिसरात आयोजित योग शिबीराचे माध्यमातून सर्व जनतेने दररोज योगा करावा आणि शक्य असल्यास नियमित योगा करावा असे आवाहन यु. बी.शुक्ल, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी सदर शिबीराच्या माध्यमातुन केले असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.