भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेअंतर्गत घरकुलाचा वैयक्तीक लाभ योजना

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेअंतर्गत घरकुलाचा वैयक्तीक लाभ योजना

गडचिरोली,(जिमाका)दि.20: इतर मागास वर्ग,सामाजिक व शैक्षाणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाव्दारे शासन निर्णय क्रमांक गनियो 2017/प्र.कर.02/विजाभज-1 दिनांक 06 सप्टेबर, 2019 नुसार ग्रामीण भागात धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजनेअंतर्गत घरकुलाचा वैयक्तीक लाभ योजना राबविण्यात येते.या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे .

आवश्यक कागदपत्रे:लाभार्थी हा भटक्या जमाती -क प्रवर्गाचा असावा. (सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलले जात प्रमाणपत्र

जोडावे.) लाभार्थी कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पैक्षा कमी असावे. (सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे.) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ( त्यासंबंधाने अधिवास प्रमाणपत्र जोडावे.) लाभार्थ्याची स्वमालकीची जागा असावी. (त्यासंबंधाने जागा मालकीचा सक्षम पुरावा जोडावा),लाभार्थी कुटूंब झोपडी/कच्चेघर/पालामध्ये राहणारा असावा.( घराच्या सद्यस्थितीचे स्पष्ट असलेला नमुना 8 अ जोडावा.) लाभार्थी कुटूंबाने यापूर्वी शासनाच्या अन्य घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.यासाठी ग्रामपंचायत सचिवांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.लाभार्थी कुटूंब भूमिहिन असावे.(तलाळयाचा भुमिहीन असल्याचा दाखला जोडावा.)घरच्या सद्यस्थितीचे छायाचित्र(फोटो)जोडावा.लाभार्थ्यांचे रेशनकार्ड जोडावे,लाभार्थ्यांचे आधारकार्ड जोडावे.विद्युत देयकाची छायाप्रत जोड़ावी.

प्राधान्यक्रम:-

पालात राहणारे,(गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारा) दारिद्रय रेषखालील कुटूंब, घरात कोणही कमावत नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अंपग महिला,पूरग्रस्त,वरील कागदपत्रांची पुर्तता असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गडचिरोली, यांनी कळविले आहे.