सिंदेवाहि विविध कार्यकारी संस्थेवर कांग्रेसचा पक्षाचा झेंडा..
अध्यक्ष पदावर अशोकराव सांगुळले तर उपाध्यक्ष पदि युवराज बोरकर विराजमान..
काल दिनांक 17/06/2022 रोज शुक्रवारला निवडणूक निर्णय अधिकारी शिडाम मैडम यांच्या अधिकारक्षेत्राखाली “विविध कार्यकारी संस्था र. न. 218 सिंदेवाहि च्या अध्यक्ष / उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणूक आठ विरुद्ध पाच अश्या बहुमताने झाली. या निवडणुकीत कांग्रेस गटातूंन निवडून आलेल्या एकूण आठ संचालकामधुन विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून अशोकराव सांगुळले आणि उपाध्यक्ष युवराज बोरकर सर यांची बहुमताने निवड करण्यात आली.
कांग्रेस गटाकड़ूंन निवडून आलेल्या संचालक अरुंन कोलते, नरेन्द्र भैसारे,अशोक तुम्मे,एकनाथ लोखंडे,सुरेखा कावळे,सिंधुताई लोखंडे या सर्व संचालक मंडळाने बहुमताने अध्यक्ष / उपाध्यक्ष या पदाकरिता आपल्या गटास बहुमताने मतदान करुंन सहकार्य केले. सदर निवडणुकीस रघुनाथ शेंडे अध्यक्ष शेतकरी-शेतमजूर संघटना,अरविंद जैस्वाल माजी सभापती तथा कार्यकारी अध्यक्ष शेतकरी-शेतमजूर संघटना सिंदेवाहि यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले.
सदर निवडणुकीत मुख्य नेतृतवाच्या भूमिकेत सुनिल उट्टलवार अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी तथा सहकारी भात गिरनी सोसायटी सिंदेवाहि, मधुपाटील बोरकर माजी अध्यक्ष स. भा. गिरनी सिंदेवाहि, रमेश बोरकर सर संचालक स. भा. गिरनी सोसायटी सिंदेवाहि, स्वप्निल कावळे अध्यक्ष न. प. सिंदेवाहि-लोनवाहि विकास पाकेवार सर इत्यादि मान्यवरांनी मोलाचे सहकार्य लाभले.
संचालक पदाच्या निवडणुकीपासून तर आज अध्यक्ष / उपाध्यक्ष पदाच्या निवडनुकी पर्यंत या निवडणुकीत चंद्रकांत चन्ने,भास्कर नन्नावार सभापती बांधकाम विभाग न.प. सि.लो.दिलीप रामटेके सभापती पा. पु. विभाग न.प. सी.लो. मयूर सूचक उपाध्यक्ष सी.लो.यूनूसभाई शेख नगरसेवक न.प. सी.लो,निताताई रणदिवे उप-सभापति महिला व बालकल्याण विभाग, मीनाक्षी मेश्राम नगरसेविका,वैशाली पुपपरेड्डीवार नगरसेविका, अस्मिता जुमनाके नगरसेविका, इत्यादिनी मोलाचे योगदान देत सहकार्य केले या निवडनुकीकरिता प्रचार-प्रसार म्हणून सहकार्य करणारे कांग्रेस पक्षाचे जयश्री स्वप्निल कावळे, रुपाली रत्नावार सरपंच मुरमाड़ी, पुष्पा शीडाम, प्रीति सागरे, संजय पुपपरेड्डीवार, माधव आदे, अनिल आदे इत्यादि मान्यवर उपस्थित होते, सर्वाणि नवनियुक्त अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या….