जिल्हा न्यायालयाचे परिसरात योग दिनांचे आयोजन
गडचिरोली,दि.17:आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दिर्घ करते. दिनांक 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रमानुसार व अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हाव सत्र न्यायाधिश, गडचिरोली ,यु.बी.शुक्ल यांचे निर्देशानुसार तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आर.आर.पाटील यांचे मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय,गडचिरोली येथे दिनांक 21 जून, 2022 रोजी योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमास न्या.यु.बी.शुक्ल, अध्यक्ष,जिल्हा अधिवक्ता संघ गडचिरोली, रविंद्र दोनाडकर, जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश,गडचिरोली, यु.एम.मुधोळकर, तदर्थ जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली, ए.एस.पंढरीकर, मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली, एम.आर.वाशिमकर, सी.पी.रघुवंशी , व्दितीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली, सह दिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली, आर.आर.खामतकर, व्दितीय सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, गडचिरोली,एन.सी.सोरते, मॅडम, प्रबंधक जिल्हा न्यायालय, गडचिरोली सौ.ए.एस.घरोटे तसेच न्यायालय व्यवस्थापक , जिल्हा न्यायालय,गडचिरोली, डब्ल्यु.एम.खान तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 21 जून 2022 रोजी जिल्हा न्यायालयाचे परिसरात आयोजित योग शिबीराचे माध्यमातून सर्व जनतेने दिनांक 21 जून 2022 रोजी योगा करावा आणि शक्य असल्यास नियमित योगा करावा असे आवाहन अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हाव सत्र न्यायाधिश, गडचिरोली ,यु.बी.शुक्ल यांनी केले आहे.