आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन : बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची गरज
चंद्रपूर, दि. 15 जून : आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून 14 वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करतांना दिसले तर तात्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालयात अथवा हेल्पलाईन क्रमांक 1098 वर कळवावे, कळविणा-या व्यक्तीचे नाव गुपीत ठेवण्यात येईल.
सर्व 14 वर्षाखालील मुलांना घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. याकरीता महाराष्ट्र राज्यामध्ये 14 वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. परंतु काही नागरिक या कोवळ्या जिवांना कामावर ठेवतात. अशा नागरिकांची माहिती कळवावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी केले आहे.