पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 15 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 16 जून 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 वाजता जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने आयोजित वेबसाईट उद्घाटन, ऑनलाईन फाईल ट्रॅकिंग सिस्टीमचे उद्घाटन, सुंदर माझे कार्यालय पुरस्कार वितरण तसेच परिचय दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले लिखित “तृतीयरत्न” या नाटकाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. रात्री 8.30 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
शुक्रवार, दि. 17 जून 2022 रोजी दुपारी 2 वाजता सावली येथे नवीन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा, सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दिव्यांग तीनचाकी सायकल वितरण तसेच तहसील कार्यालय, सावलीच्या वतीने सर्वांसाठी घरे-2022 धोरणानुसार शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण नियमाकुळ केलेले पट्टेवाटप तसेच वनहक्क पट्टेवाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.