जिल्हास्तरीय ग्राहक जनसंपर्क अभियान
अंतर्गत आयकोनीक सप्ताहाचे आयोजन
भंडारा दि. 6 : अर्थ मंत्रालय, भारत सरकार तर्फे जिल्हा अग्रणी बँक मार्फत आजादी का अमृत महोत्सव निमित्त ग्राहक जनसंपर्क अभियान अंतर्गत आयकोंनीक सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यात 08 जून 2022 रोजी लक्ष्मी सभागृह, जे. एम. पटेल कॉलेज रोड, भंडारा येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
कर्ज मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी बँका सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात सर्व बँकांचे व शासकीय योजना राबविणाऱ्या कार्यालयाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत आणि त्यावर योजनांची माहिती देण्याकरिता बँकांचे व शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. भारत सरकारच्या कार्यकारी योजना जसे पीक कर्ज (KCC) व पीक आधारित कर्ज योजना, अॅग्रिकल्चर इनफ्रास्ट्रक्चर फंड (AIF), अॅनिमल हसबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फंड (AHIDF), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना (PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY), स्टँड अप इंडिया, मध्यम व सूक्ष्म लघु उद्योग (MSME), स्वनिधी ऋण योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना ईत्यादी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येईल.
सदर मेळाव्यात जिल्ह्यातील जनतेने जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक गणेश तईकर यांनी केलेले आहे.