साकोली तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन
भंडारा, दि. 2 : अंतिम प्रभाग रचनेवर प्रभाग निहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा राखून ठेवल्यानंतर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण सोडत निश्चित करावयाचे असल्याने लाखांदुर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतमधील मतदार म्हणून पात्र असलेल्या ज्या ग्रामस्थांची विशेष सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांनी नेमून दिलेल्या तारखेला सभेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक, साकोली रमेश कुंभरे यांनी कळवले आहे.
किन्ही/ए., बापेवाडा, वडेगांव, किन्ही/मो, मालुटोला, तुडमापुरी, सोनपुरी, मुंडीपार/स, मोहगाटा, बरडकिन्ही, उमरी, कुंभली, बोंडे, केसलवाडा, सानगडी, विहिरगांव/बु., सालेबर्डी, सुकळी, पळसगाव,/सो, निजल, वांगी यांची विशेष सभा संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 4 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता आहे. तर एकोडी, पिंडकेपार, जांभळी/खां, सातलवाडा, पाथरी, बोंदरा, जांभळी, स.गुढरी, गिरोला, लवारी, परसोडी/सौ. सावरबंध, खंडाळा, झाडगांव, सानगांव, सासरा, वडद, पापडा/बु, महालगांव, गोंडउमरी ,सिरेगांवटोला यांची विशेष सभा 6जून 2022 रोजी 11 वाजता आहे.