ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या हद्दीतील मद्यविक्री तीन दिवस बंद
भंडारा, दि. 31 : राज्य निवडणूक आयोग यांचेकडून निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती मध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दूरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकूश ठेवण्यासाठी 4 जून 2022 मतदान पूर्वीचा दिवस, 5 जून 2022 मतदानाचा दिवस व 6 जून 2022 मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या 43 ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.