अभाविप वाशिम द्वारे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाशिमनगर च्या वतीने दिनांक 28 मे 2022 ला स्थानिक एजु प्लस अकॅडमी वाशिम या ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संगीता ढोले पोलीस कॉन्स्टेबल तसेच प्रमुख अतिथी म्हणून आकाश अंभोरे व प्रा. डावरे सर व जिल्हा संयोजक राहुल खरात उपस्थित होते.
या शिबिरात वेगवेगळ्या वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती साजीद पठाण बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या वरती ही राजेश जहागीरदार यांनी माहिती दिली. करियर ची निवड करताना प्रत्येक पैलूंचा सकारात्मक विचार करणे महत्वाचे असे प्रतिपादन
संगीता ढोले पोलिस कॉस्टेबल यांनी केले. समारोपीय भाषणात वाशिम जिल्हा संयोजक राहुल खरात यांनी अभाविप चा कठोर प्रवास विद्यार्थ्यांसमोर ठेवला व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. या एक दिवसीय शिबिरात वाशिम नगर व अन्य गावाहून देखील विद्यार्थी आले होते शिबिराच्या यशस्वितेसाठी श्रीरंग पाठक .व्यंकटेश डुकरे, सार्थक जाधव ,श्लोक रंगभाळ ,रवि लोखंडे या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.