आज लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साधणार संवाद

आज लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साधणार संवाद

Ø  जिल्हा परिषद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

             भंडारा, दि. 30 :  भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासनाने लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. तीन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सकाळी 9.00 वाजता जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9.45 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. तर सकाळी 10.50 ते दुपारी 12.10 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

            पहिल्या सत्रात सकाळी 9 ते 9.45 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत मान्यवरांचा संवाद होणार आहे. वरिष्ठ अधिकारी यावेळी मार्गदर्शन करतील. तसेच शासनाच्या विविध अहवाल, यशोगाथा, पुरस्कारांचे प्रकाशन सकाळी 9.45 पर्यंत केले जाणार आहे.

दुसऱ्या सत्रात सकाळी 9.45 ते 10.45 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जिल्ह्यांशी संवाद साधणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम 10.45 वाजता संपणार आहे.

तिसऱ्या सत्रात सकाळी 10.50 ते दुपारी 12.10 या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथील आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहता येईल.

            मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनांसोबतच राज्य शासनाच्या कृषी, सिंचन, आरोग्य व वैयक्तिक लाभाच्या योजनावर उद्या संवाद साधला जाणार आहे.