पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 27 : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 29 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 29 मे रोजी स. 10.30 वाजता हरंबा (ता. सावली) येथे आगमन व मातोश्री ग्राम समृध्दी शेत पांदन रस्ते योजनेंतर्गत पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स. 11.15 वा. सावली येथे राकेश गड्डमवार यांच्याकडे सांत्वनपर भेट, स. 11.45 वा. जिबगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.45 वा. मोखाळा येथे श्री. नागोसे यांच्याकडे सांत्वनपर भेट, दु.1वा. व्याहाड खुर्द येथे आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळाव्यास उपस्थिती, दु. 2 वा. व्याहाड खुर्द येथून गडमोशी (ता. सिंदेवाही) कडे प्रयाण. दु. 3 वा. तांबेगडी मेंढा (ता. सिंदेवाही) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दु. 3.30 वा. गडमोशी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायंकाळी 4 वा. कच्चेपार येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन व कॅनाल क्रॉसिंग पुलाचे लोकार्पण, सायं 4.30 वा. सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी, सायं 5 वा. किन्ही येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 5.30 वा. मुरमाडी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.15 वा. मोहाडी येथे 33 केव्ही सबस्टेशनची पाहणी, सायं. 6.30 वा. मोहाडी येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.45 वा. वाघमारे यांच्याकडे सांत्वनपर भेट, सायं. 7 वाजता कोराडी (नागपूर) कडे प्रयाण.