समाज कल्याण कार्यालयातर्फे लाभार्थ्यांकरिता संकेतस्थळ कार्यान्वित
भंडारा, दि. 25 : जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर असणाऱ्या लाभार्थ्यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा या कार्यालयाव्दारे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक तसेच संस्थाअंतर्गत शैक्षणिक व सामाजिक उन्नतीच्या योजना, समाज कल्याण कार्यालयाचे कामकाज इत्यादी माहिती वेळेवर व योग्यरित्या प्राप्त व्हावी. यासाठी समाज कल्याण कार्यालयातर्फे www.acswbhandara.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना, संस्थेस वेळेत सरकारी योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावता येईल. वारंवार जिल्हा मुख्यालयी येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होईल. सदर संकेस्थळावर समाज कल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक योजनांची माहिती तसेच अर्जाचे नमुने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सर्व लाभार्थ्यांनी www.acswbhandara.in या संकेतस्थळाचा वापर करुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.