Chandrapur l वाघाच्या हल्यात पत्त्नी ठार तर जखमी पतीचा शोधाशोध….
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील केवाडा गोंदेडा शेतशीवारतील घटना.
अचानक वाघाने हल्ला केल्याने महीलेचा मृत्यू तर मृतक महीलेचा पती जख्मी अवस्थेत बेपत्ता.
मृतक महीलेचा पती विकास जाभुळकर यांचेसाठी शोध मोहीम सुरूआहे मात्र सायंकाळ पर्यंत हाती लागलेला नाही .
चिमुर तालुक्यातील मौजा केवाडा येथील विकास जाभुळकर व मीना जाभुळकर हे दोघेही पती पत्नी तेंदुपत्ता संकलन करण्याकरीता केवाडा-गोदेडा वनपरीसरात गेले होते.
झुडपात तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची घटना आज दुपारी १२वाजता घडली आहे.
मृतक मीना चा मृतदेह मीळाला असुन जखमी अवस्थेत असलेल्या पति विकास जांभुळकर यांची जंगल परीसरात शोधाशोध सुरू आहे. शोधमोहीमेचा तपास सायंकाळ पर्यंत सुरू मात्र विकास जांभुळकर यांचा पत्ता लागलेला नाही आहे. रात्रीच्या वेळेस शोध घेण्यास वनविभागाला मोठी कसरत करावे लागणार आहे.
महिलेचा मृत्यू नेमकं वाघाने केलं कि जंगली हिंसक प्राण्यांनी हे सांगणे कठीण आहे परंतु परिसरातील लोकांनी वाघाचा हल्ला असल्याचा बोलले जात आहे.
वन विभागाला तात्कालीन माहीती देऊनही तब्बल दोन तासानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचा आरोप केवाडा वासीय जनतेनी लावला आहे. पुढील तपास वनवीभागाचे अधीकारी व कर्मचारी करित आहेत.
या घटनेमुळे
गावातील लोकामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृतक महिलेचा पतीचा शोध लागला नसल्याने अनेक तर्कवितर्क नागरिकांकडून लावले जात आहेत