6 जून ते 5 जुलै या कालावधीत नि:शुल्क उद्योजकता विकास
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Ø अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 24 मे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता चंद्रपूर येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योगसंधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, यशस्वी उद्योजकांचे अनुभव व कथन, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्ज विषयक योजना, आयात-निर्यात, सिद्धी प्रेरणा व डिजिटल मार्केटिंग आदी विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व प्रवेशाकरिता दि. 27 मे 2022 पूर्वी प्रकल्प अधिकारी के. व्हि. राठोड 9403078776 व कार्यक्रम समन्वयक स्मिता पेरके 9175229413 या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कार्यालयाच्या 07172-274416 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्हि राठोड यांनी केले आहे.