जल सुरक्षकांचे प्रशिक्षण
भंडारा, दि. 23 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी मोहाडी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र करडी, प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलसुरक्षक यांचे मान्सूनपूर्व पाणी शुध्दीकरणाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणात विहीर, हातपंप, पाणी पूरवठा करण्यात येणाऱ्या टाकी यांचे ब्लिचिंग पावडर द्वारे करण्यात येणारे शुध्दीकरण, नळगळत्या शोधणे याबाबत जलसुरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून प्रा. आ. केंद्र करडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी.तलमले, आरोग्य सहाय्यक एल. एस. राऊत तसेच प्रा. आ. जांब येथील वैद्यकीय अधिकारी पल्लवी घरडे, आरोग्य सहाय्यक संजय बाळबुध्दे, आरोग्य सेवक विजय ढोमळे तसेच ग्रामपंचायत करडी व जांब येथील जलसुरक्षक उपस्थित होते.