सिंदेवाही बस स्थानक परिसरात एका व्यक्तिचा मृत्यू
संपादक – मिथुन मेश्राम सिन्देवाही
सिंदेवाही बस स्थानक परिसरात आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ओळख पटविण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करण्यात आले.
मृतकाची ओळख पटली असुन मृतक सिंदेवाही तालुक्यातील भुज या गावचे आहे. मृतकाचे नाव प्रल्हाद वसंता आत्राम वय 42 वर्ष आहे.
पोलीसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे नेण्यात आले आहे.
घटनेची माहिती पोलीसांनी मृतकाचे नातेवाईकांना दिली आहे.
मृत्युचे नेमके कारण कळले नसले तरी दारूच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जात आहे.