अनुसूचित जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

अनुसूचित जमातीच्या मुलांना

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

       भंडारादि. 13 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी शासनाने 31 मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व 16 मार्च 2016 चे शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे.

            या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख रुपये पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना परदेशात एम. बी. ए. पदव्युत्तर, वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर, बी. टेक इंजिनिअरींग पदवी व पदव्युत्तर, विज्ञान व कृषी पदवी व पदव्युत्तर आणि इतर विषयाचे अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

            अर्ज व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भंडारा या कार्यालयाशी साधावा तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.