जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक 19 मे रोजी
भंडारा, दि. 11 : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक येत्या 19 मे 2022 रोजी होणार आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
समाजकल्याण, महिला व बालकल्याण व उर्वरित विषय समितीच्या दोन सभापती पदाची निवड होणार आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजतापासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येईल. विशेष सभेची सुरुवात 2 वाजता होईल. त्यात नामनिर्देशन पत्राची छाननी व उमेदवारी मागे घेणे ही प्रक्रिया 2.30 वाजेपर्यंत होईल. आवश्यक असल्यास दुपारी 2.30 वाजता मतदान घेण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमीत केले आहेत.