दारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार      भानापेठ परिसरात दारू दुकान सुरु होऊ देणार नाही.

दारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार
     भानापेठ परिसरात दारू दुकान सुरु होऊ देणार नाही.

चंद्रपूर
भानापेठ वॉर्ड येथे विजय टॉकीज जवळ सुरु होणाऱ्या बिअर शॉप रद्द करण्याकरिता भानापेठ वॉर्ड संघर्ष समितीने दिवाकर झोडे यांचे नेतृत्वात एल्गार पुकारला आहे. माजी नगरसेवक संजय कंचर्लावार यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
भानापेठ परिसरात बिअर शॉप सुरु होणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ भानापेठ वॉर्ड संघर्ष समितीची बैठक श्री कोलबास्वामी राम मंदिर येथे पारपडली. दिनांक २ मे रोजी परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे संयुक्त निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.
भानापेठ परिसरात सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी दारूचे दुकान होते. तेव्हाच अतिशय वाईट अनुभव असतांना आत्ताच्या काली बिअर शॉप सुरु होऊ देणे म्हणजे मागच्या काळाची वाईट अनुभूती पुन्हा होणार या विचाराने मन तळमळाले. पूर्वीचा इतका वाईट अनुभव असताना पुन्हा तीच चूक होऊ देणार नाही. भानापेठ माझे घर आहे कुठल्याही वाईट गोष्टीची भर इथे कधीच होऊ देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत भानापेठ परिसरात बिअर शॉप सुरु होऊ देणार नाही, तसेच वेळोवेळी आंदोलन देखील उभारू असे यावेळी बोलतांना माजी नगरसेवक संजय कंचर्लावार म्हणाले.
यावेळी राजेंद्र गांधी, दिवाकर झोडे, सुदर्शन बारापात्रे, दिलीप खाडिलकर, राजेश झोडे, शुभम मुक्कावार, छाया डफाडे, माधुरी कोहपरे, कल्पना खाडिलकर, जयंत बोनगीरवार, नितीन मोहाडीकर, लोमेश कुंभारे, मनीष नंदुरकर, उदय वैरागडे, मनीष हेडाऊ, बाळा कोलनकर, रमेश पराते, रमेश झाडे, अनंत बडवाईक, धीरज डफडे, भूपेश वाडगावकर, जयंत गाठे, रमाकांत कोमरवल्लीवार, पुंडलिक सोनकुसरे, श्री मोहाडीकर, अविनाश डफाडे, रमेश खाडिलकर, बंडू बोनगीरवार, अनिता बोनगीरवार, पुष्पा पतरंगे, रेखा खाडिलकर, साधना कोमरवल्लीवार, अर्चना बारापात्रे, विद्या बोनगीरवार, राजू वाडगावकर, किशोर गुजराथी, दिलीप चिमुरकर आदींची प्रामुख्याने उपस्तीथी होती.