भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करावेत
भंडारा, दि. 9 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-2023 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्रातून बरगढ (ओडिशा) करीता 13 + 1, वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्या मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज 10 जून 2022 पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे.
प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली – उगले यांनी कळविले आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, 8 वा माळा, बि – विंग, सिव्हिल लाईन, नागपूर-440001, दुरध्वनी क्रमांक – 0712-2537927 यांचे कडून प्राप्त करुन घ्यावी. अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक उपायुक्त, (वस्त्रोद्योग) सीमा पांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.