मुरघास निर्मिती युनीट करीता अर्थसहाय्य
- इच्छुक संस्थांनी संपर्क करावा
- 20 मे पर्यंत अर्ज करावे
भंडारा, दि. 5 : भंडारा जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियांना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिर युनीट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वंयसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ यांना सदर योजनेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
या योजनेसाठी प्रति युनीट रूपये 20 लक्ष खर्चापैकी 50 टक्के रूपये 10 लक्ष केंद्र शासनाचे अर्थसहाय्य राहणार आहे. अर्वरीत 50 टक्के रूपये 10 लक्ष संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदर सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती उपयोजना प्रवर्गातील संस्थांनीच अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 मे 2022 आहे. अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.एस.वंजारी यांनी केले आहे.