जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक
10 मे रोजी विशेष सभेचे आयोजन
भंडारा, दि. 27 : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीकरीता मंगळवार 10 मे रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेस सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींना आमंत्रित करण्यात आले आहे.
निवडणूकीसाठी 10 मे रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येतील. विशेष सभेची सुरवात दुपारी 2 वाजता करण्यात येईल. दुपारी 2 ते 2.15 पर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. दुपारी 2.15 ते 2.30 वाजे दरम्यान उमेदवारी मागे घेता येईल. आवश्यक असल्यास दुपारी 2.30 वाजता मतदान घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.