नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड नाही -पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø सिंदेवाही येथे महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन
Ø उपजिल्हा रुग्णालयासाठी 25 कोटी व निवास स्थानासाठी 15 कोटी
चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : गत दोन वर्षे सर्व मानवजातीने कोरोनाच्या संकटाचा सामना केला आहे. जागतिक महामारीच्या या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने नागरिकांना दिलासा देत आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या. नागरिकांच्या आरोग्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून यापुढेही सर्वोत्तम सुविधा देण्यास आम्ही कटिबध्द आहोत. यात कोणतीही तडजोड नाही, असे स्पष्ट मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर सिंदेवाही नगर पंचायतीचे अध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयुर सुचक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रोहन झाडे, नगरसेवक सुनील उत्तरवार, प.स.सदस्य राहुल पोरेड्डीवार आदी उपस्थित होते.
सामान्य लोकांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, शासकीय आरोग्य यंत्रणेत हृदयविकाराच्या उपचारापासून तर किडनीच्या उपचारापर्यंत सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तरीसुध्दा स्वत:जवळचा असलेला पैसा खर्च करून लोक खाजगी रुग्णालयात जात असल्याचे निदर्शनास येते. हे चित्र बदलविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून समर्पक भावनेने सेवा दिली तर लोकांचा ओढा निश्चितच वाढेल. या दृष्टीने आरोग्य विभागाने काम करावे.
पुढे पालकमंत्री म्हणाले, सिंदेवाही येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून त्यासाठी 25 कोटी तर निवास स्थानासाठी 15 कोटी अशी एकूण 40 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयापेक्षाही येथील उपजिल्हा रुग्णालय अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज केले जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या गत 75 वर्षात देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून देशात एम्स सारख्या आरोग्य संस्था उभ्या राहिल्या आहेत. शासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेते. मात्र नागरिकांनीसुध्दा आरोग्याविषयक विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा. कुटुंबातील तरुणांनी विविध आजार व त्यावरील उपचाराबाबत आपल्या कुटुंबातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना माहिती द्यावी. कोरोना गेला असला तरी दिल्ली आणि मुंबईत काही रुग्ण पुन्हा आढळले आहेत. त्यामुळे विनामास्क राहू नका, स्वता:ची काळजी घ्या. या मेळाव्यात विविध प्रकारच्या चाचण्या आणि तपासणी होणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरात लावण्यात आलेल्या आरोग्यविषयक जनजागृती स्टॉलची त्यांनी पाहणी केली.
डॉ. गहलोत म्हणाले, एकाच ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी आणि निदान येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार उपचार व आवश्यकता असल्यास संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाईल. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचा विमा देण्यात येतो. तसेच आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आता मोफत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर प्रास्ताविकात डॉ. कन्नाके म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा मिळाव्यात त्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्क्रिनिंग झाल्यावर तज्ज्ञांमार्फत संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, आयुष आदी विभागाचे डॉक्टर्स येथे आले आहेत. या मेळाव्यात डिजीटल हेल्थ कार्ड आणि आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात येणार असून याअंतर्गत कुटुंबाला पाच लाखांचा आरोग्य विमा मोफत आहे. त्यासाठी आधार लिंक असणे गरजेचे