‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’ योजनेअंतर्गत 24 एप्रिल ते 1 मे,2022 कालावधीत किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम

‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’ योजनेअंतर्गत

24 एप्रिल ते 1 मे,2022 कालावधीत किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम

भंडारा, दि. 22 : ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत 24 एप्रिल ते 1 मे,2022 या कालावधीत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यासाठी 24 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायातीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनद्वारे करण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून  दिलेली आहे. जिल्ह्यातील  सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी विशेष ग्रामसभेत अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच सहकार, महसूल, ग्राम विकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविभाग, नाबार्ड व जिल्हा अग्रणी बैंक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष ग्रामसभेत पात्र शेतकऱ्यांनी भरून दिलेले अर्ज घेऊन सर्व संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड 1 मे,2022 पर्यंत मंजूर होतील या दिशेनी कार्यवाही करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधीत यंत्रणेला देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी 1 मे,2022  पर्यंत आवश्यक कागदपत्रासहित विहित नमुन्यातील अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, नाबार्ड व अग्रणी जिल्हा बँकेद्वारे करण्यात आले आहे.