चंद्रपूर जिल्ह्यात इसरो चे पथक दाखल….
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिनांक 2 फेब्रुवारी २०२२ ला आकाशातुन गोल बारा फुट व्यास असलेला अवशेष व दिड फुट गोल आकाराचे अनेक बाॅल जिल्ह्यात विविध ठिकाणी पडले होते.
त्या अवशेष तपासणी साठी इसरो चे वैज्ञानिक जिल्हात येवुन घटनास्थळी भेट देऊन अवशेषाची पहानी केली आहे. हे अवशेष कशाचे असावे असा प्रश्न अनेकांच्या मनात पडले होते परंतु त्यांची खरी माहिती आजपर्यंत मिळाली नव्हती.
अवशेष कशाचे असावे याचा उत्तर कुणाकडेही नसल्याने काही लोकांनी सेटेलाट , राकेट चे अवशेष असावे तर काही लोकांनी हेलिकॉप्टर चे असावे अशीही चर्चा होती मात्र सर्वांचे लक्ष इसरो चे वैज्ञानिकांच्या माहिती कडे लागली होती. आज इसरो चे वैज्ञानिक जिल्हात येवुन आकाशातुन पडलेल्या अवशेषांची पहावी केली आहे.
अवशेष तपासणीसाठी इसरो संस्थानाकडे पाठविण्यात येणार आहेत.
अधिक माहिती साठी आलेल्या वैज्ञानिक सोबत संपर्क केला परंतु त्यांनी कोणतेही माहिती दिली नाही.