आजपासून जलजागृती सप्ताहाला सुरुवात
भंडारा, दि. 15 : नागरिकांमध्ये पाणी वापराविषयी सजगता निर्माण करण्यासाठी उद्या (दि.16) मार्च पासून 22 मार्चपर्यंत जिल्ह्यात सिंचन विभागामार्फत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
‘लोकसहभागातून जलसमृध्दीकडे’ या संकल्पनेनुसार हा सप्ताह राबविण्यात येईल. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याहस्ते उद्या सकळी 9 वाजता वैनगंगा नदीघाट येथे जलपूजन व जलप्रतिज्ञा घेण्यात येईल. त्यानंतर तिथूनच खांब तलाव, शितलामाता मंदीरापर्यंत मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते रविवार पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पूर्ण झालेल्या व बांधकामाधीन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये प्रभातफेरी, जलप्रतिज्ञा, पाणीपट्टी वसूली प्रबोधन, पथनाट्य यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 मार्च रोजी नियोजन भवनात समारोप होईल, असे अधिक्षक अभियंता ज. द. टाले व कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे यांनी कळविले आहे.