ताडोबाच्या आंतरराष्ट्रीय कोलरा गेट वर व्यवस्थापकाची मनमानी
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या कोलारा गेट वर व्यवस्थापकाची मनमानी वाढत असल्याची बाब दिवसेंदिवस समोर येत आहे,
चिमूर तालुक्यात जगप्रसिद्ध ताडोबाचे कोलारा प्रवेशद्वार आहे या सफारी गेट वर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, बऱ्याच जगप्रसिद्ध व्यक्ती नेहमीच या कोलारा प्रवेशद्वारा मधून सफारी करण्यासाठी उत्सुक असतात,त्यामुळेच हे कोलारा प्रवेशद्वार आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असतांनाच ताडोबा प्रशासनाच्या व्यवस्थापका कडून पर्यटकांना घरचा आहेर मिळत असल्याच्या घटना सध्या कोलारा गेट वर नित्याचाच झाल्या आहेत,,
एकंदरीत कोलारा बफर गेट व्यवस्थापकाची अरे रावी दिवसेंदिवस वाढत असून vip आणि अति विशिष्ट मान्यवर पर्यटक गेट वर उपस्थित असतांना जिप्सी चालक,मार्गदर्शक,आणि जिप्सी मालकांना नाहक बेबंदशाही चे नियम लावून त्रास दिल्या जात आहे,
काही मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांनी नवीन ओळखपत्र मिळण्यासाठी फोटो सहित अर्ज दिलेला असून त्यांना ओळखपत्रे मिळायचीच असतांना त्यांना तुमचे ओळपत्रे दाखवा अन्यथा तुमची जिप्सी सफारीसाठी मी सोडणार नाही अशी निरर्थक भूमिका व्यवस्थापक मनमर्जीने घेत असून तुमच्या सफरीचे पैसे जमा होणार नाही अशी धमकी जिप्सी मालकांना दिल्या जात आहे,या सर्व प्रकारात पर्यटकांना नाहक कडक उन्हात ताटकळत राहावे लागत असून त्यामुळे सफारी वर जाणाऱ्या पर्यटकांना गेट मधून जिप्सी सुटायला उशीर होत असल्याने कोलारा गेट ची प्रतिमा मालिन होत आहे,
काल एका पर्यटकाने नाव न सांगता कोलारा गेट वर घडलेली घटना सांगितल्यामुळे इथला मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून कोलारा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे,
ताडोबा अंधारी प्रकल्पाच्या नियमानुसार ज्या गावाच्या हद्दीत पर्यटन गेट असते तिथलेच स्थानिक रहिवासी सदर पर्यटन गेट वर जिप्सी मालक,मार्गदर्शक,आणि पर्यटन गेट वर कार्य करू शकतात, पण सदर व्यवस्थापक बाहेर गावचा व्यक्ती असूनही त्याला ताडोबा प्रशासनाने कोलारा गेट वर कोणत्या नियमानुसार व्यवस्थापक ठेवले आहे असा प्रश्न स्थानिक लोक करीत असून स्थानिक कोलारा गावात कोणीच शिकलेला व्यक्ती नाही का असा मुद्दा उपस्थित झाला आहे,
या पुढे आमच्या गावतीच व्यक्ती कोलारा गेट वर व्यवस्थापक म्हणून असला पाहिजे अशी भूमिका ड्राईव्हर,गाईड,जिप्सी मालक आणि गावकऱ्यांनी घेतली असून लवकरच ताडोबा क्षेत्र संचालक कार्यालयात सर्वांच्या सहमतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे